नाशिक: अवयव दान आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करिता बाईक रॅलीचे आयोजन !

नाशिक (प्रतिनिधी): भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अपोलो हॉस्पिटल्स नाशिक, ओस्तवाल ऑटो, किंग्ज ऑफ रोड आणि रि युनायटेड या ग्रुप तर्फे अवयव दान आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याकरिता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ओस्तवाल ऑटो द्वारका इथून रॅली ल सुरुवात करण्यात आली, गोविंद नगर, सिटी सेंटर मॉल, महात्मा नगर, कॉलेज रोड, गंगापूर नाका, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी मार्गे अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे रॅली ची सांगता झाली.

यावेळी उपस्थित बाईक रायडर्सना अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. अतुल सांगळे यांनी सी. पी .आर( CPR ) चे महत्व सांगून प्रशिक्षण देण्यात आले. किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ मोहन पटेल यांनी अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण याबाबत माहिती दिली तसेच अवयव दन कोणाला आणि कसे करता येईल, त्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे या बाबत मार्गदर्शन केले.

ज्येष्ठ मेंदू व मणके शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. संजय वेखंडे यांनी हेल्मेट वापराबाबत चे महत्व पटवून सांगितले तसेच हेल्मेट चा वापर न केल्यामुळे अपघातात तरुण वर्गातील मुलांचे मृत्यू हे अतिशय वेदनादायी आहे तसेच  दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट ही बळजबरी नसून आवश्यकता आहे हे पटवून दिले, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री डहाके साहेब यांनी उपस्थित बाईक रायडर्स ना रस्त्यावरून वाहन चालवताना अपघात होऊ नये तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणारे अपघात या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अपोलो हॉस्पिटल नाशिक चे डॉ. संजय वेखंडे, डॉ.मोहन पटेल, डॉ.प्रवीण गोवर्धने , डॉ. अतुल सांगळे ओस्तवाल ऑटोचे संचालक विजय ओस्तवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. डहाके उपस्थित होते. सदर बाईक रॅली मध्ये १५० हून अधिक बाईक रायडर्स सहभागी होते

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790