नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना शिधापत्रिकाधारकांनी शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची ई-केवायसी नजीकच्या रास्तभाव दुकानदारांशी संपर्क साधून ई-पॉज मशीनवर Biometric Authetication द्वारे पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी कैलास पवार व धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
रेशन कार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक असून, ज्या सदस्यांची ई-केवायसी विहित मुदतीत पूर्ण होणार नाही त्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे. तसेच ज्या वयोवृद्ध लाभार्थांचे अंगठ्याचे ठसे व आयआरएस स्कॅन होणार नाही, अशा लाभार्थ्यांची यादी कार्यालयात सादर करून त्या लाभार्थ्यांचे धान्य सुरू ठेवावे.
याबाबत शासनस्तरावरून पुढील आदेश पारित करण्यात येणार आहेत. तसेच ज्या लहान मुलांचे ई-केवायसी होणार नाही, अशा पालकांनी लहान मुलांचे कार्ड हे आधार केंद्रावरून अद्ययावत करून त्यानंतर ई-केवायसी करावी. लहान मुलांची ई-केवायसी होईपर्यंत धान्याचा लाभ बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.