नाशिक: भारतननगर झोपडपट्टी परिसरात आग; ५ जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या मुंबई नाक्याजवळील भारतनगर झोपडपट्टी या परिसरात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पाच जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये दोन लहान बालक दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. दुपारच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. परिसरातील नागरिकांनी घरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझली नाही आणि ही आग पसरत आठ घरांना लागली.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

अग्निशामक दलाने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले असून शासनाने जीवनाशक वस्तू द्याव्यात अशी मागणी पीडित परिवारांनी केली आहे. आगीचे निश्चित कारण अद्याप समजलेले नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790