नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. याची पालिकेकडे तक्रार करून व मुदत देऊनही उपयोग न झाल्यामुळे याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर पालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात विपरीत माहिती देण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने त्यावर ३ जुलैला सुनावणी आहे.
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. याविरोधात दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात २५ ऑगस्ट २०२२ रोजी जनहित याचिका दाखल केली होती.
याचिकेत २२ सप्टेंबर २०२२ रोजी पालिका स्वतःहून हजर झाली व २ डिसेंबर २०२२ रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयास रस्त्यांची दुरुस्ती करीत असल्याचे कळवले. मात्र पालिकेने न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र शहरातील रस्त्यांच्या वस्तुस्थितीच्या विपरीत असल्याने त्याबाबत पाटील यांनी १८ जानेवारी २०२३ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करून सदरची बाब उच्च न्यायालयाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर आता ३ जुलै २०२४ रोजी सुनावणी होणार आहे.