नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील ‘त्या’ मतदान ओळखपत्रांबाबत मतदान नोंदणी अधिकारी यांनी केला खुलासा !

नाशिक, दि.12 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील मतदान कार्ड बाबतचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याबाबतचा वस्तुनिष्ठ खुलासा 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशानुसार 125 नाशिक पश्चिम मतदार संघात यादी भाग 156 अनु.क्र. 381 वर मीना किसन कळमकर यांचे नाव सन 2009 च्या आगोदर समाविष्ट असून ते आजपावेतो आहे. त्यांच्या नावासमोर मतदान कार्डवर फोटो वेगळा असल्याचे समजले. सदरचे नाव जुने असून त्यात आजपर्यंत दुरूस्ती किंवा स्थलांतर असे कोणतेही बदल या मतदाराबाबत केला गेलेला नाही. त्यामुळे फोटो बाबतचा बदल कार्यालयीन स्तरावरून केला गेलेला नाही. ही त्रुटी वा चूक दुरूस्तीबाबत सदर मतदार यांनी त्यांचा अलिकडच्या काळातील छायाचित्र घेवून मतदान केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दुरूस्ती फॉर्म क्रमांक 8 भरावा. त्यानुसार त्यांचे मतदान ओळखपत्र अद्ययावत करण्यात येईल.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाला लुटले

त्याचप्रमाणे याच मतदार संघातील यादी भाग 52 अनु.क्र. 1428 वर सुनील रवींद्र वाजपेयी यांचे मतदान ओळखपत्र TGY8797748 आहे. परंतु सदर मतदार यांनी 20 मे 2024 रोजी स्थलांतर कामी फॉर्म न. 8 भरला होता. तो मंजूर झाल्यामुळे त्यांना जुना EPIC NO. TGY8797748 चे नवीन EPIC कार्ड प्राप्त झाले. दोन्ही क्रमांक एकच आहेत तसेच नाव देखील एकदाच असून दुबार नाही. पहिले कार्ड जुने असून सन 2019 चे आहे. त्यामुळे एका व्यक्तीकडे तीन ओळखपत्र असून तीनही वेगवेगळे नाही. केवळ दुरूस्ती, स्थलांतर असे बदल केल्यास अशा वेळी नवीन ओळखपत्र दिले जाते, असे 125 नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790