
नाशिक। दि. १८ जुलै २०२५: नाशिक शहर ग्रामीण गृहरक्षक दलात २३२ न्यायप्रविष्ट गृहरक्षक जवानांनी नवीन कायद्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. या जवानांचा पोलिस आयुक्तालयात समारोप सोहळा पार पडला.
शहर व ग्रामीण पोलिस दलात गृहरक्षक दलात २०२४ मध्ये २३२ गृहरक्षक जवानांची भरती करण्यात आली होती. जवानांना ३० जून ते १७जुलै १८ दिवसांत प्राथमिक प्रशिक्षण शिबिर पोलिस आयुक्तालयात येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गांतर्गत नवीन कायद्याची माहिती बाह्य वर्गमध्ये पीटी परेड, कवायत ड्रील, शस्त्र कवायत आदी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात गृहरक्षक दल संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. जवानांना पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून कर्तव्य पार पाडावे लागते. हे कामकाज करीत असताना प्रामाणिक आणि निष्ठा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन व अंमलबजावणी करणे, जनतेच्या सेवेचे कर्तव्य, शिस्त
अंगीकारण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवगत केले. सूरज सुद्रीक, आकाश ननावरे, राहुल वाडेकर या जवानांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, किरणकुमार चव्हाण, किशोर काळे उपस्थित होते.