🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: शहरात आजपासून पहिली अ.भा. मराठी भाषा आणि संस्कृती परिषद

नाशिक। दि. ०९ ऑगस्ट २०२५: कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे शहरात शनिवारपासून (दि. ९) दोन दिवस पहिली अखिल भारतीय मराठी भाषा आणि संस्कृती परिषद आयोजित करण्यात आली आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या या परिषदेत विविध गटचर्चाद्वारे विविध पातळ्यांवर मराठी भाषा सक्षमपणे कशी पोहोचेल याचा जागर होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

शनिवारी सकाळी ९.३० वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. प्रा. वसंत डहाके, डॉ. श्रीपाद जोशी, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. किरण कुळकर्णी, डॉ. श्यामकांत देव, सतीश बोरा, सुभाष सबनीस उपस्थित राहतील. दुपारी १.३० वाजता ‘मराठीच्या अवनतीची कारणे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यात प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे, डॉ. प्रकाश परब आणि सुधीर लोणी सहभागी होतील. दुपारी ३ ते ६.३० दरम्यान विविध विषयांवर सहा गटचर्चा होणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790