LPG

नाशिक: गजानन महाराजांचा २० रोजी पालखी सोहळा

नाशिक (प्रतिनिधी): श्रीसंत गजानन महाराज (शेगाव) यांच्या १४७व्या प्रकट दिन उत्सवानिमित्त २० फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यानिमित्त दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती, दुपारी १२.३० ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद आणि रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. श्री संत गजानन महाराज मंदिर, गजानननगर, जगताप मळा, बिटको कॉलेजमागे, नाशिकरोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक आर.बी. जाधव यांनी केले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790