नाशिक: पोहण्यास गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आपल्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या ओम विजय शार्दुल (१७) या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

अत्यंत होतकरू अशा या मुलाच्या मृत्यूमुळे सातपूरच्या महादेवनगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

सातपूरच्या महादेवनगर परिसरात राहणारा ओम हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होता. शाळेतून आल्यानंतर कमानीलगतच सातपूरच्या आपल्या आई-वडिलांसमवेत तो हातगाड्यावर चायनिज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करायचा. मात्र इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असल्याने १५ दिवसांपासून त्यांचा व्यवसाय बंद होता.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

परीक्षा संपल्यानंतर रविवारपासून पुन्हा व्यवसाय सुरू करू, असे त्याने आईला सांगितले व तो शनिवारी आपल्या मित्रांसमवेत गंगापूर धरणाकडील पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता.

या ठिकाणी तो यापूर्वी चार-पाच वेळा पोहण्यासाठी गेला होता. मात्र शनिवारचा दिवस त्याचा अखेरचा ठरला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. मासेमारी करणाऱ्या स्थानिक युवकाने त्याला पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे महादेवनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790