प्रभाग २४ मध्ये पाणीप्रश्न गंभीर; ‘शिवसेना, सत्कार्य’चे नागरिकांसह जलकुंभावर चढून आंदोलन

नाशिक (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक २४ मध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कर्मयोगीनगर येथे बांधण्यात आलेल्या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा करून टंचाई दूर करा, अशी मागणी करीत बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह नागरिकांनी मोर्चा काढला. या जलकुंभावर चढून आंदोलन केले. महापालिका अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गोविंदनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगर, जुने सिडकोसह प्रभाग २४ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून तीव्र पाणी टंचाई आहे. अनेकदा निवेदने देवून, रस्त्यावर उतरूनही ही समस्या सुटत नाही. सहा दिवसांपूर्वी महापालिका पाणी पुरवठा अधिकार्‍यांची भेट घेण्यात आली, तरीही यात सुधारणा झाली नाही.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

आज बुधवारी, ४ जून रोजी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली हंडे, भांडे घेवून नागरिक रस्त्यावर उतरले. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, पाणी चोरांवर कारवाई करा, पाणी नाही तर घरपट्टी-पाणीपट्टी नाही, अशा घोषणा देत नागरिक कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर पोहोचले. जलकुंभावर चढून पाणी टंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आली. महापालिका उपअभियंता हेमंत पठे, जितेंद्र चव्हाण, नाना गायकवाड, किरण साठे आदींनी आंदोलकांशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनीही या अधिकार्‍यांशी चर्चा केली. पाणीप्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, आनंदा तिडके, राजेश पाटील, बाळासाहेब राऊतराय, महेश जाधव, अविनाश कोठावदे, जयदीप पेंढारकर, देवीदास तांबोळी, विनोद पोळ, हेमंत नेरकर, किरण काळे, अशोक पाटील, साधना देशमुख, ज्योती देशमुख, योगिता गहिवड, रुपाली मुसळे, भारती चौधरी, अमृता नेरकर, शिल्पा मुळे, नंदिनी जाधव, विशाखा थोरात, अवनी कुलकर्णी, कविता कोठावदे, श्वेता काळे, तेजस्विनी पवार, अनिता आमटे, संगीता देशमुख, रमेश शिंदे, प्रथमेश बडगुजर, योगेश नेरकर, प्रकाश देशमुख, शशीकांत मोरे, रामदास चौधरी, संग्राम देशमुख, अमोल विसपुते, हेमंत चव्हाण, पुरुषोत्तम शिरोडे, मनोज पाटील, राजेंद्र भुसारी, दत्तात्रय बाचकर, दत्तात्रय चासकर, संदीप गहिवड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790