नाशिक: रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करा; अन्यथा चौकाचौकात आंदोलन करण्याचा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२५: जुने सिडको, गोविंदनगर, कर्मयोगीनगरसह प्रभाग २४ मध्ये खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने आता रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करा, खड्डे बुजवा, अन्यथा चौकाचौकात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांना याबाबतचे निवेदन शुक्रवारी, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी देण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक २४ मधील जुने सिडको, तानाजी चौक, महाराणाप्रताप चौक, महाले मळा, तुळजाभवानी चौक, उदय कॉलनी, जगतापनगर, उंटवाडी, खांडेमळा, सिद्धिविनायक कॉलनी, पांगरे मळा, बोंबले मळा, कोठावळे मळा, खोडे मळा, गोविंदनगर, कालिका पार्क, प्रियंका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद््गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, खांडे मळा, झिनत कॉलनी, फिरदोस कॉलनी, इफको कॉलनी, आर डी सर्कल ते बाजीरावनगर रस्ता, कालिका पार्क ते उंटवाडी रस्ता, दोंदे पुलालगत अनमोल व्हॅली परिसर या सर्व भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शहरातील खड्डयांप्रश्नी सत्कार्य फाउंडेशनचे ठिय्या आंदोलन !

अनेकदा निवेदने देऊनही कायमस्वरुपी खड्डे बुजविण्याची उपाययोजना करण्यात आलेली नाही. आता पावसाने विश्रांती घेतली असल्याने खडीकरण, डांबरीकरणाने तातडीने रस्ते दुरुस्ती सुरू करावी, अन्यथा चौकाचौकात निदर्शने, रास्ता रोको व धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, बाळासाहेब देशमुख, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, मनोज पाटील, मनोज वाणी, आनंदा तिडके, सतीश कुलकर्णी, पंढरीनाथ पाटील, रामदास चौधरी, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, दीपक दुट्टे, परेश येवले, राहुल काळे, सतीश मणिआर, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, सचिन राणे, पुरुषोत्तम शिरोडे, हरिष काळे, राहुल पाटील आदींसह रहिवाशांनी दिला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जय भवानी रोडला युवकाचा खून; काही तासांतच दोघांना अटक !

स्वच्छ, सुरळीत पाणीपुरवठा करा:
प्रभाग २४ मधील जगतापनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, प्रियंका पार्क या भागासह प्रभागात गेल्या आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेकदा आंदोलन करून, निवेदने देवूनही यात सुधारणा होत नाही. तीन-तीन दिवस पाणी येत नाही, अधुनमधून दूषित पाणी पुरवठा होतो. सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790