नाशिक (प्रतिनिधी): प्रत्येक वर्षी घटस्थापना ते विजयादशमी (दसरा) ह्या संपूर्ण कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थानच्या वतीने महाराष्ट्रांतील सर्व जिल्ह्यांत, तालुका, गाव पातळीवर राष्ट्रीय नवरात्रोत्सव म्हणुन श्रीदुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते.
संभाजी भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून चाळीस वर्षांपूर्वी सांगलीत प्रथमतः दुर्गामाता दौडीचें आयोजन करण्यात आले होते. पूढे याचा प्रसार होत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आग्रा इत्यादी ठिकाणी ही दौड होते. या वर्षी गुरुवार दि. ०३ ते शनिवार दि. १२ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत आणि पंचवटी, राजीवनगर रविवार पेठ, जेलरोड, सातपूर, अंबड या विविध भागांत सदर दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर दौडीत अग्रभागी परम पवित्र भगवा ध्वज, पारंपरिक आयुध पथक आणि त्यामागे पारंपरिक वेशभूषेतील जनसमुदाय अशा रचनेत एकत्रित देशभक्ती, धर्मभक्ती, भारतमाता आणि राष्ट्रभक्तीचे पद्य, जयघोष करीत अखेरीस देवीच्या आरतीने सदर दौडीची सांगता करण्यात येते. ह्या दुर्गामाता दौडीत सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थानच्या वतीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभाग अध्यक्ष मनोज राजवाडे, माहिती व प्रसिद्धी प्रमुख अजिंक्य हिंगमिरे यांनी केले आहे.