नाशिक (प्रतिनिधी): भारत सरकारतर्फे संसदेत ०१ फेब्रु. रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ सदर झाला. त्यानिमित्ताने लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे केंद्रीय अर्थ संकल्पावर प्रसिध्द व जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. श्री. विनायकराव गोविलकर यांचे विश्लेषणात्मक व्याख्यान निवेक, सातपुर, नाशिक येथे मंगळवार, ०४ फेब्रुवारी २०२५, सायं. ५.०० आयोजित केले आहे.
अर्थसंकल्पातील तरतूदींमुळे आयकर, जीएसटी, व्यवसायकर, आयात निर्यात या बरोबर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर होणारे परिणाम इ. महत्वांच्या मुद्द्यावर सविस्तर विवेचन डॉ. श्री. गोविलकर करणार आहेत.
रजिस्ट्रेशनसाठी या लिंकवर क्लिक करा: https://forms.gle/DUkAR35tFPJVVLv26
ह्या उद्बोधनपर व्याख्यानाचा लाभ MSME उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी बंधूंनी घ्यावा असे आवाहन लघु उद्योग भारती’ नाशिक शाखेतर्फे करण्यात येत आहे.