नाशिक (प्रतिनिधी): धात्रक फाटा परिसरात सायकलवरून पडल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रूद्राक्ष संजय अहिरे (रा.गोकुळ हाऊस २ कल्पेशनगर, धात्रक फाटा) असे मृत बालकाचे नाव आहे.
रुद्राक्षवर गेल्या आठवड्यापासून खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी (दि.१६) त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रूद्राक्ष अहिरे हा मुलगा गेल्या रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास आपल्या घर परिसरात सायकल चालवित असतांना ही घटना घडली होती.
सायकलवरून पडल्याने त्याच्या डोक्यास दुखापत झाली होती. कुटुंबियांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता आठ दिवसांच्या उपचारानंतर रविवारी डॉ.संजय वेखंडे यांनी त्यास मृत घोषीत केले.
याप्रकरणी अपोलो हॉस्पिटलच्या अनुप्रिता चंद्रात्रे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनकर करीत आहेत.
![]()


