प्रिस्क्रिप्शन व बिलाशिवाय औषध विक्री करणा-या औषध विक्रेत्यांविरुध्द कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): कोव्हिड १९ आजाराच्या पार्श्वभुमीवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत औषध निरीक्षकांनी जुने नाशिक भागातील काही औषध विक्रेत्यांची तपासणी केली असता प्रिस्किप्शन व बिलाशिवाय औषध विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यापैकी दोन औषध विक्रेत्यांची औषध विक्री तात्काळ थांबविण्यात आली. आणि इतर तीन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येत आहेत.

त्यांच्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार पुढील कारवाई घेण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. अशा प्रकारे कुठल्याही वर्गीकृत औषधांची डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय व बिला शिवाय औषध विक्री औषध विक्रेत्यांनी करु नये व तसे आढळल्यास त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल तसेच ग्राहकांनी सुध्दा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व चिट्ठीशिवाय स्वयंउपचार करु नये, असे आवाहन सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी केले आहे.

Loading

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790