
नाशिक। दि. ३१ ऑक्टोबर २०२५: अशोक एज्युकेशन फाऊंडेशनच्या अशोका सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. प्रीती सोनार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने⁷ शिक्षण क्षेत्रात डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. प्रा. डॉ. विद्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह-मार्गदर्शक प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे यांच्या सहकार्याने, “माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी लवचिकता कार्यक्रम विकसित करणे आणि त्याची परिणामकारकता तपासणे” असे त्यांच्या पीएचडीचे शीर्षक आहे. ही त्यांची द्वितीय पीएचडी आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एईएफचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला आणि एईएफ प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी डॉ. प्रीती सोनार यांचे अभिनंदन केले आहे.
प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. प्रीती सोनार यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
![]()

