नाशिक: ‘आनंदे गावे गाणे’ मैफलचे बुधवारी (दि. १ एप्रिल) आयोजन

नाशिक। दि. ३१ मार्च २०२६: ज्येष्ठ नागरिक व सुजाण संगीतप्रेमींसाठी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला विनामूल्य विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा जपत ‘बाबाज थिएटर्स’तर्फे १ एप्रिल रोजी या उपक्रमाचे ६५वे पुष्प सादर केले जाणार आहे.

बुधवार, दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ६.१५ वाजता गंगापूर रोड येथील कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास येथे “आनंदे गावे गाणे” ही आठवणीतल्या आनंदी मराठी भावगीतांची मैफल रंगणार आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार नरेंद्र टोंगळे आणि गायिका अपर्णा देशपांडे सुमधुर सादरीकरण करणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर मनपाची तयारी; तीन रुग्णालयांत २० खाटा राखीव

कार्यक्रमात तबल्यावर आनंद सहाणे, सिंथेसायझरवर जितेंद्र सोनावणे आणि ऑक्टोपॅडवर अजय गायकवाड वादन साथ देणार आहेत. तर किशोरी किणीकर आपल्या खुमासदार शैलीत निवेदन सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नरे यांची आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने “कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा”ही पार पडणार असून, नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यंदा सुप्रसिद्ध बासरीवादक अनिल कुटे, नाट्य-सिने अभिनेते अक्षय मुडावदकर आणि निवेदक-अभिनेते शशांक कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरीकाठी १२ नवीन घाट उभारणी; नाशिक-त्र्यंबकेश्वरात स्नानक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. निलेश पुरकर आणि सिग्मा सायन्स अकॅडमीचे संचालक डॉ. अतुल पुराणिक उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाबाज आयोजन समितीचे सदस्य कैलास पाटील, प्रा. डॉ. प्रितीश कुलकर्णी, शामराव केदार, जे. पी. जाधव, दिलीपसिंह पाटील, योगिता पाटील, प्रशांत कापसे, मिलिंद जोशी, राजा पाटेकर आणि मयुरी कांबळे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790