नाशिक। दि. २७ जुलै २०२५: गंगापूररोड, आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यात भाजी व फळ विक्री करणाऱ्यांची अतिक्रमणे पालिकेकडून हटविण्यात आली. पश्चिम विभागाच्या या कारवाईत २५ हून अधिक विक्रेत्यांना दंड करण्यात येऊन एक ट्रकभरून साहित्य जप्त करण्यात आले.
अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशान्वये विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह, नेहरू गार्डन या ठिकाणी जप्त केलेले साहित्य जमा करण्यात आले. विभागप्रमुख पी. एस. बागूल यांसह सहकाऱ्यांनी कारवाई करत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले. अन्यथा यापुढेही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. अतिक्रमणधारकांना
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790