नाशिक: कणगा आर्ट फाउंडेशनतर्फे तरुणाईच्या चित्रांचे प्रदर्शन

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

३१ मेपर्यंत विनामूल्य पाहण्याची रसिकांना संधी

नाशिक (प्रतिनिधी): कणगा आर्ट फाउंडेशन या तरुण चित्रकारांच्या चमूने इगतपुरी-घोटी परिसरातील आदिवासी पाड्यावर तीन दिवस मुक्काम केला. वैतरणा धरणाच्या परिसरात त्यांनी रंग-रेषेतून निसर्गाशी संवाद साधला. त्यातील चित्रे, छायाचित्रे यांचे प्रदर्शन तिडके कॉलनीतील इंडक्स आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात लघुपट दाखविण्यात येतो. त्यातूनही रसिकांना चार मिनिटांत तीन दिवसांच्या शिबिरातील अविस्मरणीय क्षण, दृश्य, सूर-शब्दांतून ‘अनुभवता येतात.

👉 हे ही वाचा:  नाशिक: मित्राचाच खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप

नाशिककर कलारसिकांना हे विनामूल्य प्रदर्शन ३१ मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत पाहता येईल. इंडक्स आर्ट गॅलरीचे संचालक रुचिर पंचाक्षरी आणि कला समीक्षक स्नेहल तांबूलवाडीकर यांनी कणगा आर्ट फाउंडेशनच्या युवा कलाकारांसाठी तीन दिवसांचे विनामूल्य निवासी शिबिर आयोजित केले होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
👉 हे ही वाचा:  दुर्दैवी घटना: बिबट्याच्या हल्ल्यात २० वर्षीय युवतीचा मृत्यू

युवकांना शिबिराच्या तीन दिवसांत मुक्तपणे व्यक्त होण्याचे समाधान मिळाले. कलारसिकांना हे विनामूल्य प्रदर्शन ३१ मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत पाहता येईल, या समूह चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त मुंबईतील युवा गायक शिवम लोहार यांची शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790