नाशिक: मायको सर्कल, शरणपूररोडला गळतीमुळे कमी दाबाने पाणी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

वनविभाग, पोलिस उपायुक्त कार्यालयांसमोरच अपव्यय

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवर मायको सर्कल परिसरात वनविभगाच्या कार्यालयासमोरील व्हॉल्व्हमधून, तसेच शरणपूररोडवर पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर जलवाहिनीतून गळती सुरू असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

त्यामुळे परिसरातील १० हजाराहून अधिकच्या लोकसंख्येला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शरणपूररोडवर रविवारी (दि. १८) दुपारी ३ वाजता पोलिस उपायुक्त कार्यालयासमोरील रस्त्यालगत जलवाहिनीतून गळती सुरू आहे. त्र्यंबकरोडवर मायको सर्कल परिसरात वनविभागाच्या कार्यालयासमोरील व्हॉल्व्हमधून गेल्या १५ दिवसांपासून गळती सुरू असून, येथून मायको सर्कलपर्यंत रोजच पाणी वाहात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, रोजच्या या नासाडीमुळे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790