नाशिक। दि. ११ ऑक्टोबर २०२५: नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला ‘राजाश्रय’ देणाऱ्यांना कठोरपणे मोडून काढा, असे निर्देश पोलीस आयुक्तांना देताना, मी त्यांना पूर्णतः मोकळीक दिली आहे. कुणी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घालू नका, मग तो भाजपाचा असला तरीही त्याच्यावर कारवाई करा.
कुणाचा भूतकाळ काय आहे याचा विचार न करता, तो जर आता गुन्हेगारीत असेल तर त्याची गय करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपच्या बैठकीसाठी शुक्रवारी (दि. 10) नाशकात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस आयुक्तांकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुन्हेगारी रोखण्यासाठी मी पोलीस आयुक्तांना यापुर्वीच कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिकमध्ये काही वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.
![]()

