NC

नाशिक: तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज (दि. ७) उच्च न्यायालयात सुनावणी

नाशिक। दि. ७ जानेवारी २०२६: तपोवनातील साधुग्राम तसेच माईस हब उभारणीसाठी पालिकेच्या वतीने वृक्षांवर कुऱ्हाड कोसळू शकते. या विरोधात मनसेचे शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पंडीत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा

या याचिकेवर बुधवारी (दि. ७) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान पालिकेने माईस हब प्रकल्प रद्द केल्याबाबतचे पूरावे न्यायायालत सुनावणी दरम्यान सादर करावे किंवा लेखी हमी देण्याची मागणी याचिकाकर्ते पंडित यांनी केली आहे.

तपोवनातील साधुग्रामसाठी १८२५ झाडे तोडण्याला परवानगी देऊ नये, माईस हब प्रकल्पाला स्थगिती देण्यात यावी किंवा रद्द करण्यात यावा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान उच्च न्यायालय याबाबत काय आदेश देणार याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790