मौजे नाशिक हद्दीतील मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विस्तारीत क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या मौजे नाशिक (नाशिक 4) या गावाच्या क्षेत्रातील सर्व मिळकतीचे नगर भूमापन नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यांचे मालकी हक्क निश्चित करण्यासाठी मिळकतीचे हक्क चौकशीची कामे सुरू आहेत, अशी माहिती विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्रमांक 3 नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ड्रग्ज पेडलर्सकडून १३ ग्रॅम एमडी पावडर जप्त; दोघांना बेड्या

महानगरपालिका विस्तारीत क्षेत्रात एप्रिल 2024 मध्ये मौजे नाशिक शहर 4 गावठाण येथील सर्वे नंबर 388 पैकी, 390, 390 पैकी, 391 पैकी, 392 पैकी, 393 पैकी, 440, 441, 449 व 450 मधील मिळकतीचे हक्क चौकशीचे काम उप अधीक्षक, भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्रमांक 3 यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. हक्क निश्चिती व चौकशीचे काम पूर्ण झाल्यानंतर नकाशे अंतिम करून मालमत्ता पत्रक, सनद तयार करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बांधकाम प्रकल्पावर पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

त्या अुनषंगाने वरील नमुद सर्वे नंबरमधील मिळकत धारक/भूखंड धारक/शेतमिळकत धारक यांनी पुराव्याच्या कागदपत्रांअभावी होणाऱ्या संभाव्य संभाव्य त्रुटी टाळण्यासाठी त्यांचे हक्क सिद्ध करणारे पुरावे, त्याबाबतच्या साक्षांकित नकला व इतर पुरावे विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्रमांक 3, महानगरपालिका जुनी इमारत (टेरेस वर), नवीन पंडीत कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक या कार्यालयात सादर करावेत.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकारांवर पोलिसांचे छापे; ४२ लाख रुपये रोख व १७९ साठेखत जप्त !

वरील नमुद सर्व्हे नंबर मधील मालमत्ता धारकांनी त्यांच्या मिळकतीचा नकाशा व हक्काची अचूक नोंद होण्यासाठी हक्क सिद्ध करणारे पुरावे जसे अधिकार अभिलेखाचे पुरावे(7/12 उतारा), शासकीय मोजणी झाली असल्यास मोजणी नकाशा,  नोंदणीकृत खरेदी दस्त, रजिस्टर वाटणी पत्रक, डिक्लेरेशन डिड, नगर रचना, नाशिक यांच्याकडील मंजुर इमारत नकाशा, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला इत्यादी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

2318 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790