नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरासह परिसरातील स्वच्छता करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. मंगळवारी (दि.२३) तपोवन कॉर्नर येथील जी टी टायर्स येथे एका महिला स्वच्छता कर्मचाऱ्याला तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र सापडले. त्यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठले अन् ते मंगळसूत्र पोलिसंच्या स्वाधीन केले. त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलिसांकडून सन्मानित करण्यात आले असून, यासह महानगरपालिकेतर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (दि.२१) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कृष्ण नगर मधील वडनेरे दाम्पत्य जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. शतपावली करत नवजीवन हॉस्पिटल समोर असलेल्या जे. के. टायर्स तपोवन कॉर्नर येथून जात असताना, पाठीमागून दुचाकी वरून आलेल्या अज्ञात दोघा संशयितांनी वडनेरे यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सुमारे ४५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून नवीन आडगाव नाक्याच्या दिशेने पोबारा केला.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

याबाबत वडनेरे दांपत्याने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मंगळवारी (दि.२३) तपोवन कॉर्नर येथील जी टी टायर्स येथे मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील महिला स्वच्छता कर्मचारी अर्चना सचिन गांगुर्डे साफ सफाई करत असताना त्यांना तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र सापडले.

त्यांनी ते पंचवटी पोलिस ठाण्यात जाऊन जमा केले. अर्चना गांगुर्डे यांचा प्रामाणिकपणा पाहून गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व पोलिस निरीक्षक प्रशासन सुशील जुमडे, पोलिस निरीक्षक ज्योती आमने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.आवेश पलोड, पंचवटी विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे, दीपक चव्हाण यांचे तर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वडनेरे दाम्पत्य देखील उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790