नाशिक शहरातील ‘या’ भागात शनिवारी (दि. २३ ऑगस्ट) वीजपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. २१ ऑगस्ट २०२५: महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या गोदापार्क या नवीन विद्युत उपकेंद्राला ३३ केव्ही वाहिनी जोडणीच्या कामाकरीता शनिवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कॉलेजरोड व परिसरातील वीज पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी आदि कर्मयोगी अभियान यशस्वीपणे राबवावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

यामध्ये गंगापूर रोड, जेहान सर्कल, सहदेव नगर, डी के नगर, डिसूजा कॉलनी, चोपडा लॉन्स परिसर, जुना गंगापूर नाका, नेर्लेकर हॉस्पिटल परिसर, पाटील लेन १ ते ४,पाटील कॉलनी, डोंगरे वस्तीगृह सिग्नल परिसर आणि कॉलेज रोड हा भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत !

दिलेल्या वेळेपुर्वी काम पुर्ण झाल्यास विद्युत पुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येईल. तसेच या दरम्यान शक्य झाल्यास पर्यायी उपकेंद्रावरून वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व कृपया सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग – २ चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790