नाशिक (प्रतिनिधी): वडाळागावासह परिसरातील विद्युतवाहिनी दुरुस्ती कामासाठी शनिवारी (दि. ३१) सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. उपनगर उपकेंद्रातून निघणारी ११ केव्हीची विद्युतवाहिनीवरील दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार आहे. वेळेपूर्वी काम झाल्यास वीज पुरवठा अगोदर सुरू होऊ शकतो.
🔎 हे वाचलं का?: कुंभमेळा २०२७: विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक
प्रभावित होणारा परिसर असा साई संतोषीनगर (वडाळागाव), महाराष्ट्र कॉलनी, मदिनानगर, एस.एन. पार्क, गुलशननगर, साठेनगर, मेहबूबनगर, सादिकनगर, स्मशानभूमी, विमानतळ परिसर तसेच शनी मंदिर, पाटील गार्डन, जाखडीनगर, आत्मविश्वास सोसायटी, सप्तशृंगी मिठाई समोरील रथचक्र चौक, पेठेनगर या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.
या भागातील रहिवाशांनी वीज खंडित होणार असल्याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

