नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मेनरोड येथील श्री गणेश भक्त मंडळी ट्रस्टच्या गणपती मंदिरात १३३ वा माघी गणेश जन्मोत्सव १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान साजरा होणार आहे.
उत्सवाची सुरुवात शनिवारी (दि. १०) रात्री ९.३० वा प्रसिद्ध बासरीवादक पं. किरण हेगडे (मंगलोर) येथील यांच्या वादनाने होईल. रविवारी (दि. ११) सायं ७ वा. वे. शा. सं. पं. प्रभाकर श्रीकृष्णशास्त्री गोडसे, स्मार्त चुडामणी पं. शांतारामशास्त्री भानोसे आणि ब्रह्मवृंद वेदोक्त मंत्रजागर करतील.
सोमवारी (दि. १२) रात्री ९.३० वा. श्री गणेशभक्त संगीतसेवा होईल. मंगळवारी (दि. १३) सकाळी ११ वा. श्रीकृष्णबुवा शिखरे यांचे श्रीगणेश जन्माचे कीर्तन होईल. दुपारी १२.३० वा. श्री जन्मसोहळा साजरा केला जाईल. उत्सवाची सांगता बुधवारी (दि. १४) रात्री ९.३० वा. नाशिकचे युवा गायक सागर कुलकर्णी यांच्या गायनाने होईल