नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. २ जून २०२०) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात सातपूर राजवाडा (आंबेडकर चौक)-१, इच्छामणी नगर (नाशिकरोड)-१, दोंदे मळा (पाथर्डी फाटा)-१, गोसावी वाडी (नाशिकरोड)-२, पेठ रोड -३, एमएचबी हॉस्पीटल (पंचवटी)-२, कला नगर (दिंडोरी रोड)-१, समता नगर (टाकळी)-१, वीर सावरकर नगर(सिडको)-१ यांचा समावेश आहे.
म्हणजेच सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण आठ आणि रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये १३ असे मंगळवारी दिवसभरात एकूण २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790