NC

नाशिक: म्हसरूळला तीन फ्लॅट्सचे कडी कोयंडे तोडून घरफोडी; ३ लाखांचा मुद्देमाल लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): म्हसरुळ परिसरातील एकाच अपार्टमेंटमधील दोन तर लगतच्या दुसऱ्या अपार्टमेंटमधील एक असे तीन फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल चोरून नेत भरदिवसा घरफोड्या केल्या आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील वाहतुकीबाबत महत्वाची अपडेट.. जाणून घ्या सविस्तर…

शैला किरण निकम (रा. महिंद्रा रेसीडेन्सी, प्रभातनगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १९) सकाळी ११ ते ४ या दरम्यान अज्ञात चोरट्यांने त्या राहत असलेल्या इमारतीतील फ्लॅट नं. चारचा कडीकोयंडा तोडून १५ हजारांची रोकड, २ लाखांची सोन्याची पोत, ७५ हजारांचे सोन्याचे कानातील झुबे, एटीएम कार्ड असा ऐवज चोरून नेला.

🔎 हे वाचलं का?:  मराठी भाषेत शिकूनच झालो सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश-निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई

चोरट्यांनी या इमारतीतील मयुर पुंडलिक उगले यांचा ३० हजारांचा लॅपटॉप चोरून नेला. यानंतर या चोरट्यांनी लगतच असलेल्या केतकीनगरमधील सिद्धीविनायक अपार्टमेंटमील सविता सुरेशचंद्र बाविस्कर यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून ४० हजारांचे सोन्याचे चोख बिस्किट, ६ हजारांची रोकड, ३० हजारांचे सोन्याचे कानातील टॉप्स असा सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भरदिवसा व एकाच परिसरात झालेल्या या घरफोडीच्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790