नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या अंबड लिंक रोड भागातील हॉटेल येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की झाल्याचा प्रकार समोर आलाय,प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेकडून दिवसेंदिवस कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जातेय, ज्यात अनेक परिसरातील आस्थापना, हॉटेल नियम पळत नसल्या कारणाने अनिश्चित काळासाठी सील देखील केले जात आहेत. मात्र अश्याच एका कारवाई दरम्यान व्यावसायिक आणि मनपा कर्मचारी यांच्यातच वाद होण्याच्या घटना आता दिवसेंदिवस समोर येत आहे. नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवर हॉटेल सील करण्यासाठी गेलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनाच धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
येथील नियमांचे उल्लंघन करून एक चायनीज हॉटेल सुरू असल्याबाबत समजल्यानंतर मनपा कर्मचारी आणि पोलिस यांनी संयुक्तीकरित्या कारवाई करण्यासाठी गेले होते. हॉटेलची पाहणी करत असताना हॉटेल मालकाकडून वाद घालण्यात आला,पाहणी करत असलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनाच थेट धक्काबुक्की करण्यात आली. तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक देखील गोळा होत महापालिका कर्मचारी यांचावर धावून गेल्याचे चित्र होते.
ह्या संपूर्ण प्रकाराबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून..अंबड पोलिस याबाबत अधिक तपास करत आहे…..