नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अल्पवयीन मुले, मुली तसेच महिलांना अडीअडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत मिळण्यासाठी ‘निर्भया हेल्पलाइन’ पोलिस प्रशासनाने कार्यान्वित केली आहे.
त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करून त्यांना तत्काळ मदत उपलब्ध होण्यासाठीदेखील हेल्पलाइन कार्यान्वित केल्याचे नाशिक शहर नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांनी सांगितले.
अल्पवयीन मुले- मुली तसेच महिलांना फोन, मेसेज, सोशल मीडियाचा वापर करून किंवा प्रत्यक्षात मुली व महिलांची छेड काढली जाते.
अशा प्रसंगी मुली व महिलांना विनाविलंब पोलिसांची मदत उपलब्ध होण्याच्या दृष्टिने निर्भया हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आल्याचे श्री. बगाडे यांनी सांगितले.
हेल्पलाइन क्रमांक:
निर्भया हेल्पलाइन : २३०५२४३/१०९१
ज्येष्ठ नागरिक : २३१७२२७/१०९०
![]()


