नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बहिण भावास नऊ लाख रूपयांना एकाने गंडा घातल्याचा प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. दीड वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने व पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने भावाने पोलीसात धाव घेतली.
संदिप बाबुलाल वाघ (४० रा. अंबड) असे भावाबहिणीस गडविणा-या भामट्याचे नाव आहे. याबाबत अक्षय शरद शिरोडे (रा.मुरारीनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने आपली शासकिय कार्यालयांमध्ये मोठ्या ओळखी असल्याचे भासवून भाऊ बहिणीस सरकारी नोकरीचे आमिष दाखविले होते. शिरोडे यांचा विश्वास संपादन करून त्याने २०२२ मध्ये नऊ लाखाची रोकड स्विकारली.
मात्र आज तगायत दोघाना नोकरी लागली नाही. दीड वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने शिरोडे यांनी पैश्यांची मागणी केली असता संशयिताने टाळाटाळ केल्याने शिरोडे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २५५/२०२४)