नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सुयोग हॉस्पिटलेचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित राजेंद्र मोरे यास न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रविवारी (दि. २५) संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि डॉ. रिना राठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित राजेंद्र चंद्रकांत मोरे, रोहिणी मोरे या दोघांनी संगनमत करत पती डॉ. कैलास राठी यांचे घेतलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने संशयित मोरे याने रुग्णालयात येऊन डॉ. राठी यांच्यावर कोयत्याने १८ वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
या हल्ल्यात डॉ. राठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पंचवटी पोलिसांनी संशयित दांपत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयिताला २४ तासांत शनिवारी संतोष टी पॉईंट येथे अटक केली होती.