नाशिक (प्रतिनिधी): मुंबईहून नाशिक शहरात एमडी तस्करी करणाऱ्या एका महिलेसह तीन संशयितांना सोमवारी (दि. १४) न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंमली विरोधी पथकाचे अनिरुद्ध येवले यांना माहिती मिळाली मुंबई येथून काही संशयित एमडी विक्री करण्याकरीता शहरात येत आहे. पथकाने संशयित स्कोडा कारचा पाठलाग करत नाशिकरोड येथे संशयित कार पकडली.
कारमधील संशयित फैसल ऊर्फ दाढी शफी शेख (रा. आर्टिलरी सेंटररोड), शिबान शफी शेख, हिना शिबान शेख या संशयितांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता पाकिटात ९९.५ ग्रॅम वजनाचा सुमारे ४ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचे ड्रग्ज मिळून आले. शिबानविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात खून, दरोडा, प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत.
गंभीर गुन्हे दाखल असलेले संशयित गुन्हेगार एमडी तस्करी करत असल्याचे तपासात पुढे आले. नाशिकरोडमधील चार सराईत गुन्हेगारांवर तस्करीचा गुन्हा दाखल आहे.