कोरोनाचे निर्बंध, उल्लंघन, दंड, अंमलबजावणी आणि नागरिकांची सजगता….

कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर नाशिक शहर पोलीस आणि मनपा प्रशासन यांनी संयुक्तपाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

सुरुवातीला मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त एवढेच काय तर स्वत: पालकमंत्री छगन भुजबळ रस्त्यावर उतरले आणि नागरिकांना नियम पाळण्याबाबत आवाहन करू लागले..

मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्यांवर सुरुवातीला कारवाई झाली. त्यांची कोरोनाची टेस्टही करण्यात आली. मात्र बाजारपेठांमधील गर्दी कमी होत नव्हती.

शेवटी कडक कारवाईला सुरुवात झाली. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही जी दुकानं, उघडी होती, त्यांच्यावर दंड आकारण्यास सुरुवात झाली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

खरं म्हणजे कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून नियमांची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. हॉटेल्सच्या बाबतीतही तेच घडले.

त्यामुळे जी हॉटेल्स नियमांचे उल्लंघन करत होती किवा आहेत त्यांच्यावर आता धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. यात अनेक हॉटेल्स पोलिसांनी सीलसुद्धा केले.

आता हॉटेल्स असो किंवा दुकाने ठराविक वेळेनंतर जी दुकानं किंवा आस्थापना उघडी दिसतील त्यांच्यावर थेट कारवाई सुरु झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

रात्री फार्म हाऊसवर रंगणाऱ्या पार्ट्यावर सुद्धा कारवाई सुरु झाली आहे. एकीकडे लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रशासन नियम पाळा म्हणून आवाहन करतंय आणि दुसरीकडे एक हाय प्रोफाईल वर्ग हुक्का पार्टी करतंय..

एकीकडे समाजातील सामान्य माणसाला लॉकडाऊन लागला तर उपजीविका कशी चालवायची हा प्रश्न पडलाय तर दुसरीकडे “आपलं कुणीच काही करू शकत नाही” असा विचार करत नियम पायदळी तुडवून मुजोरी करणारा एक वर्ग आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

आजही जर आपण ठरवलं, नियम पाळले तर कोरोनाचा वाढणारा संसर्ग नक्कीच कमी होऊ शकते.

एव्हाना अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंग साठी मार्किंग करायला सुरुवातही केली आहे. शिवाय नो मास्क नो एन्ट्री हा नियमसुद्धा कठोरपणे पाळायला हवा !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790