नाशिक: गणेशोत्सव वर्गणीसाठी धर्मादाय विभागाची परवानगी आवश्यक; अन्यथा कारवाई

नाशिक। दि.13 ऑगस्ट, २०२५ (जिमाका वृत्तसेवा): गणेशोत्सव 2025 करिता वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. परवानगी मिळविण्यासाठी गणेश भक्तांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर रितसर अर्ज सादर करून परवानगी घ्यावी, असे आवाहन नाशिक विभागाच्या धर्मादाय उप आयुक्त् प्रणिता श्रीनिवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41-अ प्रमाणे धार्मिक किंवा धर्मादाय प्रयोजनाकरिता कोणताही पैसा, वर्गणी, देणगी किंवा इतर मालमत्ता गोळा करणारी कोणतीही व्यक्ती (अशी व्यक्ती या अधिनियान्वये नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नसेल) अशा ज्या प्रयोजनासाठी अशी वसुली करीत असेल त्याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयास कळविणे बंधनकारक असून धर्मादाय आयुक्तास अटी शर्तीच्या अधीन राहून व योग्य वाटल्यास परवानगी देण्यात येईल.

👉 हे ही वाचा:  नाशिकला यलो अलर्ट, आज मध्यम पावसाची शक्यता !

परवानगी घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करतांना सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या सदस्याचे अधिकृत ओळखपत्र ( आधारकार्ड/ पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ निवडणूक ओळखपत्र), जागा मालकीचे संमतीपत्र / महानगरपालिका/ नगरपालिका/ ग्रामपंचायत यांचे नाहरकत प्रमाणपत्र, मंडळ स्थापित केल्याचा ठराव, मागील वर्षाचा जमा खर्चाचा हिशेब (रूपये 5 हजार पेक्षा जास्त असल्यास अधिकृत लेखा परीक्षक अथवा सनदी लेखापालाकडून केलेला लेखा परीक्षण अहवाल) या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल; जाणून घ्या सविस्तर…

धर्मादाय आयुक्त विभागाची परवानगी न घेता कोणतेही मंडळ वर्गणी गोळा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा मंडळांविरूद्ध कलम 41-फ प्रमाणे द्रव्यदंडासह तुरूंगवासाची शिक्षा अशी कारवाईची तरतुद आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790