
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ असलेल्या एका सोफा सेट बनविणाऱ्या फर्निचर दुकानाला आग लागल्याची घटना घटना आज (मंगळवारी) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ सोफासेट बनविण्याचा कारखाना आहे. या आगीत सोफासेट बनविण्याचा कारखांना पूर्णपणे जळुन खाक झाला आहे. तसेच या आगीत शेजारी असलेल्या चारचाकी वाहनांच्या गॅरेजमधील लाखो रुपयांच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर कारखान्यातील स्पंज, फोम, काथ्या,रेकझीन,कापड व लाकडी साहित्य जळाले आहे.
दरम्यान, या आगीची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आले होते. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. सदर आगीत मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
![]()


