नाशिक: अधिकाऱ्यांनी वाहनावर चढत, खिडकीतून डोकावत शोधला 11 लाखांचा गुटखा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीत पोलिस बंदोबस्तात कुलुपबंद गोदाम फोडून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने ११ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला.

बुधवारी (दि. १३) ही कारवाई करून संबंधिताविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सातपूर कॉलनी परिसरातही एका व्यावसायिकाकडून प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंचवटीतील पेठरोडवरील बाळकृष्ण निवास या गोदामामध्ये गुटखा असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला मिळाली होती.

सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. सहायक आयुक्त विवेक पाटील यांनी दुचाकीच्या सहाय्याने गोडावूनच्या खिडकीतून आतमध्ये डोकावत गुटखा असल्याची खात्री केली.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

चौकशीअंती जागामालक शिवाजी पवार यांनी गोदाम दिनेश अमृतकर यांना भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले. अमृतकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळला. त्यानंतर ‎पंचवटी पोलिसांच्या बंदोबस्तात व पंचांच्या समक्ष एफडीच्या‎ अधिकाऱ्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत ११ लाखांचा गुटखा‎ जप्त केला. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांनी ‎मंगळवारी (दि. १२) सातपूर कॉलनीतील पवन कोतकर यांच्या‎ दुकानावर छापा टाकून ११ हजार २७२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा ‎साठा जप्त करत काेतकर विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.‎

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790