नाशिक: २८ कोटींची फसवणूक; विजय राठींसह नऊ जणांवर गुन्हा दाखल !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जागा डेव्हलपमेंट करार करण्याकरिता २८ कोटी रुपये घेत जागा विकसित न करता परस्पर दुसऱ्या व्यवसायिकासोबत करार करून फसवणूक केल्याप्रकरणी राठी आमराई जागामालक विजय राठी यांच्यासह नऊ जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागा विकसित करण्याचा डेव्हलपमेंट करारनामा करून 28 कोटी रुपये घेऊनही जागा डेव्हलप न करता एका उद्योजकाची फसवणूक करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय कचरदास बेदमुथा (वय 59, रा. दत्तमंदिर चौक, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पंडित कॉलनीत कार्यालय आहे. बेदमुथा यांचा १ हेक्टर ५४ आर, प्लॉट नंबर ४१९  हा प्लॉट विकसित करण्यासाठी फिर्यादी बेदमुथा हे डेव्हलपर्सचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

अखेर आरोपी विजय जगन्नाथ राठी, कौशल्याबाई जगन्नाथ राठी, सुजाता सतीश मंत्री, अर्चना श्रीकुमार मालानी, श्रुती सुशांत लढ्ढा, आदिती प्रणय अग्रवाल, दीपक जगन्नाथ राठी, वृंदा अरविंद राठी, सुषमा बाळकृष्णा काबरा (सर्वांचे पूर्ण पत्ते माहीत नाहीत) या सर्वांनी संगनमत करून फिर्यादी बेदमुथा यांची भेट घेतली व त्यांना त्यांचा प्लॉट नंबर 419 याचे क्षेत्रफळ 1 हेक्टर 54 आर ही जागा विकसित करून देतो, असे बेदमुथा यांना सांगितले.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

त्यानुसार जागा विकसित करण्याचा डेव्हलपमेंट करारनामा करण्यात आला. त्यापोटी फिर्यादी बेदमुथा यांच्याकडून एकूण 28 कोटी 10 लाख 12 हजार 475 रुपयांची रक्कम स्वीकारली; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून व अनेक दिवस उलटूनही सदरचा प्लॉट डेव्हलप करून न देता फिर्यादी बेदमुथा यांची आर्थिक फसवणूक केली.

हा प्रकार दि. 25 नोव्हेंबर 2008 ते दि. 11 जून 2023 या कालावधीत गोळे कॉलनीतील गिरधरवाडी येथे घडला. याबाबत फिर्यादी बेदमुथा यांनी आरोपींकडे डेव्हलपमेंटसंदर्भात दिलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर बेदमुथा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन पुरुष व सहा महिला अशा नऊ जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ९४/२०२४). पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here