नाशिक मध्यमधून फरांदेंना मिळणार मताधिक्य; महिला व नवमतदारांचा विश्वास !

नाशिक (प्रतिनिधी): दोन पंचवार्षिकात प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा मतदारसंघात पूर्वापार भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. कायमच बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाचे सूज्ञ मतदार येत्या निवडणुकीत विक्रमी मतदान करतील. दि. 20 रोजी अनुक्रम 2 पुढील कमळ या निशाणी समोरचे बटण दाबून मोठ्या मताधिक्याने प्रा.फरांदे यांना विधानसभेत पाठवतील, असा विश्वास मतदारसंघातील सर्वसामान्य महिला, नवमतदार युवती व्यक्त करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वर आता 'अ' दर्जाचे तीर्थक्षेत्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

2014 व 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत आ. देवयानी फरांदे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. सलग दोन पंचवार्षिकात आमदार म्हणून जनसेवेची संधी त्यांना मिळाली. त्यांचे सोने केले. या कालावधीत त्यांनी ‘माझं नाशिक ; माझी जबाबदारी ’ ही संकल्पना राबवली. समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करून त्यांच्या मनातील अपेक्षेप्रमाणे मतदारसंघात विकास आराखडा तयार केला. तो पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. म्हणून आम्ही कायमच प्रा.फरांदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मतदारसंघातील महिला सांगत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पीएफवर व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

नाशिक मध्य मतदारसंघातील विविध समाजघटकांशी संवाद साधला, तेव्हा सर्वांनी भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनाच आपली पसंती असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आमचे सशक्तीकरण होणार आहे. जनतेच्या हक्काच्या पैशातून आम्हाला दरमहा 1,500 रुपये मिळवून देण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले. मतदारसंघात महिलांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण एक महिला आमदार म्हणून त्यांनी केले आहे. विविध भागात मंदिरे बांधून दिली. त्यामुळे भक्तीमय प्रसन्नता, शांतता निर्माण झाली आहे. भजन, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम सातत्याने होतात. सर्वांमध्ये आपुलकीचा ओलावा व एकोपा वाढीस लागला आहे. मुलांवर चांगले संस्कार होतात. आम्ही समाधानी आहोत, असे महिलांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790