नाशिक: वाढत्या डेंग्यू रुग्णांची केंद्राकडून गंभीर दखल; केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरामध्ये डेंग्यू रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे तीन सदस्यांचे पथक शहरात सर्वेक्षणासाठी दाखल झाले आहे. सर्वेक्षण सुरू असतानाच गोविंदनगरमधील एका रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला असून, संभाजी चौकातील एका इमारतीत बांधकाम प्रकल्पावर डेंग्यू अळ्या आढळून आल्या. शहरात होत असलेली धूर फवारणी कागदावरच होत असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आली.

शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. मागील वर्षात १ हजार १९१ डेंग्यूबाधित रुग्ण आढळले होते. डिसेंबर २०२३ मध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. या वर्षी मे महिन्यापासून शहरात पुन्हा डेंग्यू रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्यात ३९ रुग्ण होते, मात्र जून महिन्यात रुग्णांची संख्या १६१ पर्यंत पोचली. नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा विभागीय आरोग्य संचालक डॉ. सरिता सपकाळ, डॉ. अरविंद अलोने, कीटकशास्त्रज्ञ श्री. माने यांच्यासह नाशिक महापालिकेचे डॉ. नितीन रावते यांनी शहरात पाहणी केली.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

पथकाकडून पाहणी सुरू असतानाच उंटवाडीतील एका बांधकाम साइटवर डेंग्यू अळ्या आढळल्या. संभाजी चौकात एका इमारतीमध्ये वॉचमन रूमशेजारील कुंडीत अळी आढळल्या. धूर, जंतुनाशक औषधांची फवारणी योग्यरीतीने व नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंस्थेच्या पार्श्वभूमीवर लोक सहभाग वाढविणे, शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती करणे, शासकीय कार्यालय व बांधकाम साइटवर डेंग्यू उत्पत्तीस्थाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हे ही वाचा:  नाशिक: पाऱ्यात घसरण, थंडीचा जोर वाढला; नाशिकचे किमान तापमान 12.4 तर, निफाड 10.9 अंश सेल्सियस

डेंग्यूचा दुसरा बळी: जानेवारी ते ४ जुलै अखेरपर्यंत शहरात डेंग्यू एकूण २७१ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर गुरुवारी एका ७० वर्षीय रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. गोविंदनगर भागामध्येच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका ५० वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला होता.”केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाकडून डेंग्यू आजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी पाहणी सुरू आहे. पथकाने डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना दिल्या.”- डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790