नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पार्ट टाइम जॉब आणि जास्त परताव्याचे आमिष दाखवून नाशिकच्या एका व्यक्तीस तब्बल ९४ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल संजय शिंपी (वय: ३४, रा. विखे पाटील शाळे जवळ वृदावननगर, अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
शिंपी गेल्या १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना टेलीग्राम आयडीधारक व व्हॉटसअपच्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी संशयितांनी नोकरीच्या मागे न लागता गुंतवणुकीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी शिंपी यांना टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण करण्यासाठी शिंपी यांनी संशयितांच्या सांगण्यावरून विविध बॅक खात्यात पैसे भरले असता ही फसवणुक झाली आहे. शिंपी यांनी १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान तब्बल ९४ लाख १३ हजार ४४१ रोकड भरूनही मुद्दलासह मोबदला न मिळाल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. (सायबर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५८/२०२३). अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
![]()


