LPG

नाशिक: फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा घातला गंडा

नाशिक (प्रतिनिधी): फॉरेक्स ब्रोकरने ट्रेडिंगमध्ये जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इसमास ९४ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे त्यांच्या घरी असतांना त्यांना दोन व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकधारकांनी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादी यांच्याबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅटिंग व व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना ऑनलाईन फॉरेक्स ब्रोकर असल्याचे भासविले, तसेच ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

त्याचप्रमाणे फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून गुंतवणूक करण्यासाठी १७ लाख १२ हजार ६०० रुपये, तसेच गुंतविलेले पैसे विथड्रॉल करण्यासाठी विविध टॅक्सच्या नावाखाली ७७ लाख १९ हजार ६७५ रुपये असे एकूण ९४ लाख ३२ हजार २७४ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले; मात्र बरेच दिवस उलटूनही गुंतविलेल्या रकमेवर जादा नफा मिळाला तर नाहीत; पण गुंतविलेली रक्कमही परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर २०२४ ते दि. १८ डिसेंबर २०२४ दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे घडला.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: नाशिक रिंगरोडच्या ३ हजार ९५४ कोटींच्या नागरी कामांना प्रशासकीय मान्यता

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790