नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): संत सावता माळी रोडवर भरदिवसा मुलाला शिकवणीस सोडून घराकडे पायी जाणा-या महिलेच्या तोंडावर स्प्रे फवारून त्यांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घडली आहे.
विशेष म्हणजे स्प्रे मारणारी महिलाच असल्याचे समोर आले आहे. यावेळी चोरट्या महिलेने सोन्याची अंगठी आणि कानातील टाप्स काढून पोबारा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसी रजनीकांत पाठक (३३ रा. गार्डन व्ह्यू अपा.दर्शन कॉलेज जवळ,श्रध्दाविहार इंदिरानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाठक या रविवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास मुलास शिकवणीसाठी सोडण्यासाठी गेल्या होत्या.
संत सावता माळी रोडवरील मोकळया मैदानातून त्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून पायी येणा-या अनोळखी महिलेने काही कळण्याच्या आत जवळ येताच त्यांच्या तोंडावर स्प्रे फवारला.
या घटनेत डोळ्यात आग होवू लागल्याने पाठक या जागेवरच जमिनीवर खाली बसल्या असता भामट्या महिलेने त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची अंगठी व कानातील स्टाप्स असा सुमारे २२ हजार ३०० रूपयांचा ऐवज बळजबरीने काढून पोबारा केला.
अल्पवाधीत झालेल्या या घटनेनंतर सावरलेल्या पाठक यांना दागिने काढून घेतल्याचे निदर्शनास येताच मुंबईनाका पोलिस धाव घेतली असून याबाबत जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.