नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अंबड परिसरातील विवाहितेवर पोटदुखीच्या इलाजासाठी वडाळागावातील संशयित भोंदूबाबाकडे नेण्यात आले. त्यावेळी संशयित भोंदू बाबाने तिला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्यावर उपचार सुरू केले.
यादरम्यान तिला गुंगीचे औेषध देत त्याने बलात्कार केला. तसेच याबाबत वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयित भोंदूबाबाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुसन यासीम शेख (रा. मेहमूद नगकर गल्ली नंबर-२, वडाळागाव) असे संशयित भोंदूबाबाचे नाव आहे. पीडित १९ वर्षीय विवाहितेचे पोट दुखत असल्याने पती, सासूच्या सल्लाने वडाळागावातील हकिमाकडे उपचारार्थ नेले होते. वारंवार पाेट दुखत असल्याने शुक्रवारी (ता. २६) पीडिता हुसनकडे आली.
त्याने पीडितेला भूतबाधा झाल्याचे सांगत तिच्यावर उपचार सुरू केले. या दरम्यान तिच्यावर गुंगीकारक औषध दिल्याने पीडितेची शुद्ध हरपून ती बेशुद्ध झाली. तेव्हा त्याने अत्याचार केल्याचा आराेप पीडितेने केला आहे. दरम्यान, हुसनला अटक झाली असून त्याला न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. तपास सहायक निरीक्षक सुनील अंकाेलीकर करत आहेत. संशयित आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलाम ६४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790