नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर येथे कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत बनावट नोटांचा भरणा करण्यात आल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ५०० च्या तेरा नोटांचा भरणा ग्राहकाने बँकत केल्याचे पुढे आले आहे. याबाबत व्यवस्थापक स्वप्निल नगरकर (रा.आयोध्या नगर पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे.
गेल्या सोमवारी ( दि.३) रोजी हा प्रकार घडला होता. बँकेत एक खातेदार सकाळी ११ वाजता ५५ हजार रुपये डिपॉझिट करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्यातील पाचशेच्या तेरा नोटा बनावट असल्याचे आढळून आले. बँकेतील कॅशियर अंकिता गायकवाड यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ खातेदारास व्यवस्थापना समोर हजर केले.
यावेळी संबधीत ग्राहकाची विचारपूस करण्यात आली असता त्याने “मी लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मेडिक्लेमचे काम करतो.” असे सांगितले. या नोटा मला अहमदनगर येथील एका रुग्णालयातून मिळाल्याचे सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.