नाशिक: मुलीच्या वादातून मित्राचा खून करण्याची तयारी; ९ कोयते, चॉपरसह सहा अल्पवयीन मुले ताब्यात

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शाळेत मुलीवरून झालेल्या वादातून मित्राचाच खून करण्याच्या तयारीतील ६ अल्पवयीन मुलांना ९ चॉपर, कोयत्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने गोदापार्क, चिंचबन, मखमलाबाद येथे ही कारवाई केली. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे गंभीर घटना टळली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण गुन्हे शाखेच्या ताब्यात !

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पथकाचे नितीन जगताप यांना दहावीच्या शेवटच्या पेपरला मुलांमध्ये वाद होणार असल्याची माहिती मिळाली होती. दोन संशयित घातक शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याने पथकाने मखमलाबाद नाका परिसरातील एका शाळेच्या परिसरात सापळा रचला.

२ तरुणांपैकी काळ्या रंगाच शर्ट, निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेला एकजण त्या ठिकाणी संशयास्पद आढळला. दुसराही तेथेच होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत

पथकाने दोघांची घटनास्थळीच चौकशी केली आणि बॅगची झडती घेतली असता त्यात ९ चॉपर, कोयता सापडला. चौकशीत त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून शाळेतील मित्रासोबत मैत्रिणीवरून वाद झाल्याने त्याचा गेम करणार असल्याची धक्कादायक कबुली त्यातील एकाने दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने इतर पाच मुलांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे घटना टळली आहे. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड़, चेतन श्रीवंत, रमेश कोळी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790