नाशिक: गोणीत आढळलेल्या महिलेच्या ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली !

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळच्या रस्त्यालगत मोकळ्या भूखंडावर मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह कांद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोणीत टाकून फेकून दिल्याचे आढळून आले होते.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते. अखेर म्हसरूळ पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवून नातेवाइकांचाही शोध घेण्यास बुधवारी (दि.२७) यश आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यालगत भूखंडावर दोन मोठ्या गोण्या काही जागरूक नागरिकांना बेवारस टाकलेल्या दिसल्या, तसेच परिसरात दुर्गंधीही येत होती. यामुळे त्यांना संशय आल्याने पोलिसांना कळविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोणीतून मृतदेह काढला असता मोठी दुर्गंधी पसरली होती. ३० ते ३५ वयोगटातील महिलेच्या मृतदेहाच्या मानेभोवती फास आवळलेला असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

यामुळे महिलेचा कोणी तरी अज्ञात व्यक्तीने घातपात करत खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून निर्जन ठिकाणी फेकून पोबारा केला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली होती.

पोलिसांनी तपासचक्रे वेगवान करत महिलेची ओळख पटवून नातेवाइकांचा शोध घेतला आहे. मात्र, अद्याप या महिलेचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा पोलिसांना होऊ शकलेला नाही.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमन ऊर्फ सुलोचना बाळू पखाने (३२, रा. जातेगाव, ता. त्र्यंबक) अशी महिलेची ओळख पटली आहे. याबाबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here