नाशिक (प्रतिनिधी): वही घेण्यासाठी जवळच्याच दुकानात गेलेल्या ८ वर्षांच्या मुलाकडून चुकून धक्का लागून दुकानातील साहित्य खाली पडले. याचा राग आल्याने दुकानदाराने त्या मुलाच्या अंगावर वळ उठेपर्यंत चप्पल, बुटाने बेदम मारल्याची घटना बुधवारी (दि. २५) रात्री सिडकोच्या पवननगरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार जमादार अन्सारी (७८), बशीर जमादार अन्सारी (३६) व इरफान जैनुद्दीन अन्सारी (२४) या तिघांना ताब्यात घेतले आहे.
पवननगरमधील दुसरीत शिकणारा यशराज अभिजित पाटील हा त्याच्या १३ वर्षीय लोकेश पाटील या आतेभावासोबत परिसरातील लकी जनरल स्टोअर्समध्ये वही घेण्यासाठी गेला होता. दुकानात त्याच्याकडून चुकीने धक्का लागून काही वस्तू खाली पडल्याने दुकानमालक जमादार अन्सारी (क्य ७८) यांनी चप्पल-बुटांनी बेदम मारहाण केली.
यशराजचा आत्येभाऊ लोकेश याने धावतच घर गाठत हा प्रकार यशराजच्या वडिलांना सांगितला. यशराजचे वडील अभिजित पाटील हे जाब विचारण्यास दुकानात गेल्यावर त्यांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.
दोघांना तत्काळ अटक:
मारहाण करणाऱ्याचे वय ७८ असल्याने त्यांना आरोपी केले आहे. इतर दोघांना अटक सुनील पवार, केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलीस स्टेशन