नाशिक: किराणा दुकान फोडून २२ हजारांचा ऐवज लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): बंद दुकानाचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्याने दुकानातील तुपाचे डबे, काजू-बदाम, इलायचीची पाकिटे व रोख रक्कम असा सुमारे २२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रासबिहारी रोडवर घडली.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

फिर्यादी गणेश मंगेश कांगने (रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, रासबिहारी रोड, नाशिक) यांच्या मालकीच्या किराणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने कशाने तरी अट लावून उचकटवले. व त्याद्वारे दुकानात प्रवेश करुन दुकानात असलेले ३ हजार रुपये किंमतीचे तुपाचे डबे, २ हजार रुपये किंमतीचे २५० ग्रॅम वजनाचे काजु-बदामची पाकिटे, ३ हजार रुपये किंमतीचे वेलदोडे, परिवार चहाची १० पाकिटे, ५०० रुपये किंमतीचे बोर्नव्हीटाचे ५ डबे व १२ हजार ५०० रुपयांची रोकड असा २२ हजार रुपयांचा ऐवज दुकान फोडून चोरून नेला.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे करीत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790